advertisement

खंडेरायाच्या वाघ्या-मुरळीचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर, 'फुला'चं पोस्टर आऊट, या दिवशी होणार रिलीज  

Last Updated:

खंडोबाच्या वाघ्या मुरळींचा नाच अनेकांना आवडतो. पण त्या नाचाच्या मागे दडलेला त्यांचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'फुला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

News18
News18
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'फुला' असं सिनेमाचं नाव असून सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 'फुला' ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेवर आधारित आहे.
या सिनेमात प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, गायक रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे, आकाश नवगिरे यांच्या दमदार आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. अभिषेक जावीर दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या समाधान ऐवळे यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
advertisement
चित्रपटाविषयी दिग्दर्शक अभिषेक जावीर म्हणाले, "फुला" हा चित्रपट म्हणजे केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर तो महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्त्वाचा जीवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना कधीही त्यांची स्वप्नं, हक्क, प्रेम, सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांची कला घेतो, पण त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. वास्तवाचं प्रामाणिकपणे चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.
advertisement
चित्रपटाचे चित्रीकरण आणि टीम ही आटपाडी गावातील असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. हा सिनेमा येत्या 17  एप्रिलपासून चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
खंडेरायाच्या वाघ्या-मुरळीचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर, 'फुला'चं पोस्टर आऊट, या दिवशी होणार रिलीज  
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement