TRENDING:

Shocking : डहाणू हादरलं! नेहमीचंच भांडण वाटलं, पण पतीने सगळंच संपवलं, क्रूर कृत्य उघड

Last Updated:

Dahanu Crime News : डडाणूमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे पती-पत्नीच्या वादाचा शेवट अत्यंत वेदनादायक झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पालघर : पत्नी-पतीमध्ये वाद होणं अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. हे वाद बऱ्याचदा शांतही होतात पण क्विचितच हे प्रसंग धक्कादायक वळण घेतात. सध्या डहाणूमधून असं एक प्रकरण समोर आलेले आहे. ज्यात पत्नीचा मृत्यू झालेला आहे.
News18
News18
advertisement

पती-पत्नीमध्ये असं काही झालं की थेट शेवट

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला अलका संजय मेढा (वय 40) या आपल्या पती संजय मेढा यांच्यासोबत निकणे हाडळपाडा येथे राहत होत्या. दोघांमध्ये घरगुती कारणांवरून नेहमीच वाद होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

6 मार्च रोजी सुद्धा सकाळच्या वेळेस पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या संजय मेढा यांनी अलका यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर, पोटावर तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाली.

advertisement

मारहाणीमुळे त्या गंभीर जखमी झाल्या आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकरणी अजय तांबडा (वय 35) यांनी कासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संजय मेढा याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सध्या कासा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : डहाणू हादरलं! नेहमीचंच भांडण वाटलं, पण पतीने सगळंच संपवलं, क्रूर कृत्य उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल