नेमकी घटना काय घडली?
या घटनेची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मुलगी १४ वर्षांची होती. ती कल्याण पश्चिममध्ये आपली आई, आजी आणि बहिणीसोबत राहत होती. नियमित अभ्यास करूनही गुणांमध्ये सुधारणा होत नसल्याने ती प्रचंड तणावाखाली होती, असं प्राथमिक तपासातून दिसून आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अलीकडे दिवाळीपूर्वी झालेल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे शिक्षकांनी सातत्याने तिला अभ्यासात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे तिची चिंता वाढली होती, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
advertisement
19 व्या मजल्यावरून मारली उडी?
घटनेच्या दिवशी तिने आपल्या राहत्या फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली. ती पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर पडली. ही घटना घडताच आसपासच्या लोकांनी तातडीने या मुलीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण १९ व्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
नागपुरात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या
दुसरीकडे, नागपूरमध्ये देखील एम्समध्ये शिकणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं आहे. तिने राहत्या फ्लॅटमध्ये सिलिंग फॅनला ओढणीने बांधून गळफास घेतला. समृद्धी कृष्णकांत पांडे असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची कन्या होती. ती अभ्यासात प्रचंड हुशार होती. तरीही तिने आत्महत्या का केली? या प्रश्नाने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
