नेमक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडप चित्रपट संपल्यानंतर घरी परतले तेव्हा त्यांनी ज्यांच्याकडे मुलं सांभाळण्यासाठी दिली होती त्यांना कॉल करुन त्यांना परत घरी सोडण्यासाठी सांगतिले. पण त्या ओळखीच्या व्यक्तीने पालकांना सांगितले 'मुलगी नाही घरी' तेव्हा त्या पालकांच्या पायाखालची जमिनच सरकरली.
दोन वर्षांची चिमुकली कुठे गेली? कोण घेऊन गेले? कोणत्या अवस्थेत असेल? हे विचार पालकांना अस्वस्थ करत होते. एका क्षणात आनंदाचा दिवस दुःखात बदलला. पालकांनी तातडीने ठाणे पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला हा प्रकार सांगितला. पोलिसांनीही क्षणाचा उशिर न करता चिमुकलीचा तपास सुरु केला.ज्या परिसरातून मुलगी बेपत्ता झाली तेथील सीसीटीव्ही शिवाय अनेक साक्षीदारांचे जबाब यावर पोलिसांनी तपास सुरु ठेवला.
advertisement
पोलिसांच्या प्रयत्नांना यश
पोलिस तपास करत असताना या सर्व तपासाचा धागा थेट अंबरनाथपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी हा मुलांना सांभाळण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीचाच जवळचा मित्र होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी सुखरूप वाचवले.
