पत्नीचा शेजाऱ्यांकडे वावर खटकला
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील आहे. जिथे काही वर्षापासून एक जोडप वास्तव्यास आहे. हीच महिला वारंवार शेजारी असलेल्या घरात जाणून जास्त वेळ बसते. सततच्या गोष्टीमुळे महिलेच्या पतीला संशय आला आणि त्यातून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
advertisement
दरम्यान 21 फेब्रुवारीही त्या पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्याने तिला रात्री पुन्हा एकदा शेजाऱ्यांच्या घरी जास्त वेळ का घालवते असा जाब विचारला. तेव्हा पत्नीने संबंधित शेजाऱ्याला घरी बोलावले आणि मग पतीने त्यालाही ''माझी पत्नी तुमच्या घरी दिवसभर बसते, तुम्हाला काही वाटत नाही का?'' असा प्रश्न विचारला.
या प्रश्नामुळे शेजाऱ्याला राग आला. त्याने पतीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि जमिनीवर पाडले. त्यानंतर शेजाऱ्याच्या 18 वर्षीय मुलीने वडिलांना खाली पडलेले पाहून घराबाहेर ठेवलेली स्टीलची बादली त्याच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला.
बाप-लेकीविरोद्धात गुन्हा दाखल
घटनास्थळी झालेल्या या वादामुळे परिसरात हा झालेला प्रकार समजला आणि जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला असून बाप-लेकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
