मुंब्र्यातील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंब्रा हिरवं करण्याविषयीच्या तिच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका तर केली पण, आता भाजप नेत्यांनी सहर शेख हिच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज सहर शेख हिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेती .सोमय्यांनी थेट मुंब्रा पोलिसांत धाव घेत कारवाईची मागणी केली. तर नवनीत राणांनी थेट त्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखवलाय. या सर्व विरोधानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांना मुंब्रा पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.. पोलिसांनी सहर शेख यांच्यावर आधीच नोटीस देत कारवाईही केलीय. मात्र ही कारवाई मान्य नसल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. पोलिसाांनी बजावलेल्या नोटिसीमध्ये येणाऱ्या काळात 'झालं लावत संपूर्ण मुंब्रा हिरवे करू', असं सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार त्या नोटीसच्या माध्यमातून कारवाई केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
सहर शेख यांच्या भाषणामध्ये कुठेही 'वृक्ष किंवा झाडे लावू' असा उल्लेख नसून मुंब्रातल्या 20 टक्के हिंदू बांधवांना संपवण्याचा आणि त्यांना धमकवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला जात असून शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
