ठाणे: मतदार यादी संदर्भात घोळ असल्याप्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता. त्याचबरोबर संपूर्ण मतदार संघामधील मतदार याद्या हाताळण्याकरिता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने मनसे कार्यकर्ते यावेळी प्रचंड संतापले. तसेच अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधील संगणकांची तोडफोड केली आहे.
advertisement
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये मतदार याद्यांचा मुद्दा कमालीचा चर्चेत आहे. मुंबईसह ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी दुबार नावांसह इतर दुरूस्त्या मतदार याद्यांमध्ये आहेत. याच दरम्यान, आता मनसेने निवडणूक कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे. मतदार यादीमध्ये घोळ असल्यामुळे ही मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, त्याची दुरूस्ती करण्यासाठी एकच व्यक्ती असल्यामुळे मनसैनिकांची संताप झाला. म्हणून त्यांनीही तोडफोड केली आहे.
यापूर्वी अनेक राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणं, मोर्चा काढणं, निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणं यांसह अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम राजकीय पक्षांकडून केले जात होते. परंतु आता निवडणुका घोषित होण्याच्या काही मिनिटं आधीच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊनच थेट तोडफोड केली आहे. मनसे अधिकारी निवडणुक आयोगाच्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधताना ही तोडफोड झाली.
मुंब्र्यामध्ये आज अंतिम निवडणुक यादी जाहीर करण्यात येणार होती. परंतु ही यादी घोषित करण्यासाठी उशिर लागत असल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापून निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे.
