मृतदेहाची ओळख ही अशोक सिंग राजपूत अशी पटली असून तो आरोपींचा मित्र होता. या घडलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत छडा लावून दोन आरोपींनी अटक केली असून 10 एप्रिलपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. दिनेशकुमार प्रजापती(वय27) आणि त्याचा साथीदार संदीप तिवारी (वय35) असे आरोपींची नावे आहेत.
नेमके घडले काय होते?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजीच्या सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका आंब्याच्या वाडीत हा शीर नसलेला मृतदेह आढळून आलेला होता. त्यानंतर या घटनेप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास अन्
पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. त्यात पोलिसांनी परिसरातील तब्बल 200 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी घेतली आणि एका वाहनावर संशय आला.यात पोलिसांनी तपास करत दिनेशकुमार प्रजापती याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिशेकुमारची चौकशी सुरु केली असता त्यात त्याने किराणा व्यवसायातील आर्थिक वादातून त्याचा खून केल्याची कबुली दिली आणि ओखळ पटू नये म्हणून शीर वेगळे केले. आरोपींनी दिलेल्या कबूलीनुसार पोलिसांनी तात्काळ शीर शोधण्यासाठी नदीकिनारी शोध सुरु केला.
