TRENDING:

सगळे उपाय केले, पण पोटदुखी थांबेना, शेवटी निर्णय घेतला अन् शस्त्रक्रिया केली, ‘ते’ दृश्य पाहून सगळ्यांना धक्का

Last Updated:

Navi Mumbai News: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्या म्हात्रे कुटुंबाने शेवटी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात धाव घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: मूतखड्याच्या वेदना अगदी असह्य झाल्याने अनेकजण वेगवेगळे उपचार घेत असतात. नवी मुंबईत अशीच गुंतागुंतीची 3 तासांची शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे एका रुग्णाच्या पोटातून तब्बल पाव किलो (260 ग्रॅम) वजनाचा मूतखडा डॉक्टरांनी बाहेर काढला. त्यामुळे घणसोलीतील कृष्णा राम म्हात्रे यांना नव जीवन मिळाले आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मीळ मानली जात असून तिची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे.
असह्य वेदना, तब्बल 3 तासांची शस्त्रक्रिया; पोटात पाव किलोचा...., ‘ते’ दृश्य पाहून सर्वांनाच धक्का
असह्य वेदना, तब्बल 3 तासांची शस्त्रक्रिया; पोटात पाव किलोचा...., ‘ते’ दृश्य पाहून सर्वांनाच धक्का
advertisement

घणसोली येथील कृष्णा राम म्हात्रे हे गेल्या वर्षभरापासून मूतखड्याच्या वेदनांनी त्रस्त होते. त्यासाठी त्यांनी अनेक आयुर्वेदिक उपचार घेतले. तसेच खासगी रुग्णालयातही हेलपाटे मारले. मात्र, समाधानकारक निदान झाले नाही. नेरुळमधील एका रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च सांगण्यात आला.

तुमच्याही डोळ्यांना होतोय त्रास? चष्मा लागूच नये म्हणून वेळीच घ्या ही काळजी, डॉक्टरांचा सल्ला

advertisement

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्या म्हात्रे कुटुंबाने शेवटी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात धाव घेतली. पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे आणि वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश राठोड यांच्या सहकार्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या ठिकाणी युरोलॉजिस्ट डॉ. गौरव कासट यांनी गुंतागुंतीची तीन तास शस्त्रक्रिया केली. तसेच म्हात्रे यांच्या पोटातून तब्बल 260 ग्रॅम वजनाचा मूतखडा काढला.

advertisement

म्हात्रे यांना नव जीवन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, मूतखड्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूतखड्याचा हा प्रकार दूर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मराठी बातम्या/ठाणे/
सगळे उपाय केले, पण पोटदुखी थांबेना, शेवटी निर्णय घेतला अन् शस्त्रक्रिया केली, ‘ते’ दृश्य पाहून सगळ्यांना धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल