सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगर पालिकेने नागरिकांना आवाहन केले की, "आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला औद्योगिक आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा तात्पुरता असून डोमेस्टिक अर्थात घरगुती गॅस सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत याची नागरिकांनी नोंद घ्यावी. यामुळे नागरिकांनी अस्वस्थ होऊन घाबरून न जाता गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये असे सूचित करण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलेंडर वापरासाठीचा गॅस पुरवठा (PNG/LPG) सुरळीत राखण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून रुग्णालयातील रुग्णांसाठीचे आणि शालेय पोषण आहारासाठीचे जेवण बनवण्यासाठीही गॅस पुरवठा सुरळीत राहील याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे."
advertisement
" तरी नागरिकांनी गॅस सिलेंडरचा पुरवठा करून ठेवू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये. अधिकृत विश्वासार्ह माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत काही अडचण भासल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर 27 x 7 संपर्क साधावा तसेच याकडे ठाणे जिल्हास्तरीय शिधावाटप कार्यालयाकडूनही बारकाईने लक्ष देण्यात येत असून जिल्हा शिधावाटप कार्यालयातील अधिकारी प्रशांत काळे (संपर्क ध्वनी 9158883644) अथवा नवी मुंबई शिधावाटप कार्यालयातील अधिकारी छाया पालवे (संपर्क ध्वनी- 9967913891) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे." अशी पोस्ट नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शेअर करण्यात आली आहे.
