प्रेमात अडथळा ठरणाऱ्याचा 'काटा' काढण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार आदर्श शर्मा हा एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र ती तरुणी दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय त्याच्या मनात होता. याच कारणावरून त्याने राग धरला होता. दरम्यान तरुण कॉलेज सुटल्यानंतर रिक्षा स्टॉपकडे जात असताना ही घटना घडली.
मधुबन येथील ओलम्पस बिल्डिंगच्या गेटसमोर असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ आरोपी आदर्श शर्मा आणि त्याचा एक साथीदार पांढऱ्या स्कुटरवरून आले. त्यांनी पीडीत तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याशी वाद घातला. वाद वाढताच आदर्श शर्माने पॅन्टच्या मागे लपवून ठेवलेला चाकू काढून तरुणावर वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. वालीव पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
