प्रवासापूर्वी हे वाचा
मिळालेल्या माहितीनुसार,ठाणे शहरातील पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामामुळे 23 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत रवी स्टील नाका ते माजिवडा मेट्रो स्टेशन आणि रवी स्टील नाका ते कॅडबरी जंक्शन (ज्युपिटर मार्गे) या दरम्यानचा सेवा रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती वळवण्यात येणार आहे.
या कामादरम्यान हार्दासनगर कट येथे वाहतुकीचे वळण देण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
जाणून घ्या पर्यायी मार्ग
1)हार्दासनगर येथून डावीकडे वळून वसंत लॉन्ससमोरील रस्ता वापरावा.
2)ज्युपिटर कटवरून उजवीकडे वळून ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील स्लिप रोड घ्यावा.
3)लोढा कासा किंवा टीसीएसकडून येणाऱ्या वाहनांनी हार्दासनगर येथे उजवीकडे वळावे.
या बदलामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी मार्गाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे. शक्य असल्यास पर्यायी रस्त्यांचा वापर करावा आणि गर्दीच्या वेळा टाळाव्यात. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
