ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करून कॅडबरी जंक्शनजवळील पुलाच्या बांधकामाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च ते 30 एप्रिल 2026 पर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कॅडबरी जंक्शन ते नितीन जंक्शनला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडवर जे कुमार कंपनीकडून सध्या पाच-मार्गी पूल बांधला जात आहे. काम सुलभ करण्यासाठी सर्व्हिस रोडवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
वाहतूक सुरळीत व्हावी आणि गर्दी कमी व्हावी यासाठी, वाहतूक पोलिसांनी अनेक सर्व्हिस रोड पॉइंट्सवरील एन्ट्री बंद केले आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा पर्याय सुद्धा दिला आहे. धर्मविर कट सर्व्हिस रोड मार्गे तिन हात नाका जंक्शनकडे जाणाऱ्या बसेस आणि जड अवजड मालवाहतूक वाहनांना तसेच इतर सर्व वाहनांना धर्मविर कट सर्व्हिस रोडवर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. तर सर्व वाहतुकदारांना नाशिक मुंबई हायवे स्लीप रोडने तिन हात नाका जंक्शनवरून पुढे इच्छित स्थळी जातील.
वासुदेव बळवंत फडके (भक्ती मंदिर) मार्गावरुन सर्व्हिस रोडवर येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सर्व्हिस रोडवर डावे वळण घ्यायला 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. मोदी हुंडाई कट वरुन सर्व्हिस रोडवर येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सर्व्हिस रोडवर डावे वळण घ्यायला 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. एच.डी.एफ.सी. कट वरुन सर्व्हिस रोडवर येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सर्व्हिस रोडवर डावे वळण घ्यायला 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुकदारांना उजवे वळण घेऊन धर्मविर कट मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.
प्रवेश बंदी आणि पर्यायी मार्गांचा वापर 16 मार्च 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकदारांना करावा लागणार आहे. फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कोणतेही नियम लागू नसतील.
