TRENDING:

Thane News: भाडं, चाकू आणि पुणे! Ola ड्रायव्हर 'शिकार' करायला गेला अन् जिवाशी गेला, इंजिनिअर तरुणाचे हात भरले रक्ताने!

Last Updated:

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओला ड्रायव्हर नासिर अहमदच्या हत्येप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलि‍सांनी टिटवाळ्यातून आरोपी आदर्श भालेरावला अटक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओला ड्रायव्हरबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेला ओला ड्रायव्हर नासिर अहमदच्या हत्येप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलि‍सांनी टिटवाळ्यातून आदर्श चंद्रकांत भालेराव याला अटक केली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांना ओला ड्रायव्हरचा मृतदेह ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळशेज घाटाजवळ आढळला होता, तर त्याची रक्ताने माखलेली कार कल्याण- मुरबाड रस्त्यावरील गोवेली गावाजवळील एका सुनसान जंगलात आढळली होती. आता या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्राइम ब्रँचने आरोपीला अटक केली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

ओला ड्रायव्हरच्या हत्येचं गुढ ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्राइम ब्रँचने सोडवलं आहे. पोलिसांनी आरोपीला टिटवाळ्यातील गोवेली गावतून अटक केली असून कारसुद्धा त्याच्याकडूनच ताब्यात घेतली आहे. तर मृतदेह माळशेज घाटातून ताब्यात घेतला आहे. पोलीस उपअधिक्षक अनिल लाड यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श इंजिनीअरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. आदर्शला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पुण्याला जायचं होतं. त्यामुळे त्याने ओला कॅब बुक केली होती. माळशेज घाटामध्ये कार आल्यानंतर नासिरने रस्त्यामध्ये कार थांबवून आदर्शला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या झटापटीत आदर्शच्या हाताला चाकू लागला.

advertisement

त्यानंतर आदर्शने त्याच चाकूने नासिरची हत्या केली. त्या झटापटीत नासिरचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आदर्शने नासिरचा मृतदेह माळशेज घाटामध्येच सोडून दिला होता. आदर्श नासिरच्या कारने टिटवाळ्याला आला. आदर्शने ही कार, गोवेलीतील जंगलात सोडून तिकडून पळ काढला. नवी मुंबईतील रबाळे परिसरात राहणारा नासिर अहमद ओला कॅब ड्रायव्हर होता. त्यातूनच तो त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करायचा. चार दिवस आधी नासिर अचानक गायब झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार रबाळे पोलीस स्थानकांत दाखल केली होती. शनिवारी (7 मार्च) अहिल्यानगर जिल्ह्यातील माळशेज घाटातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलि‍सांना मिळाली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

पोलीस तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, तो मृतदेह ओला ड्रायव्हर नासिर अहमदचाच असल्याचा खुलासा झाला. तर, नासिरची कार कल्याण- मुरबाड महामार्गावरील गोवेली गावातील जंगलामध्ये मिळाली होती. जेव्हा टिटवाळा पोलि‍सांनी कारचा तपास केला तेव्हा कारमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग आढळले. कारमध्ये रक्ताचे डाग आढळल्यामुळे पोलिसांच्या मनात संशय आला. घटनेचे गांभीर्य पाहता ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वात विशेष टीमची स्थापना केली. टीमने केलेल्या संपूर्ण तपासानंतर ठाणे ग्रामीण पोलि‍सांच्या क्राइम ब्रँचने आदर्श भालेरावला अटक केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: भाडं, चाकू आणि पुणे! Ola ड्रायव्हर 'शिकार' करायला गेला अन् जिवाशी गेला, इंजिनिअर तरुणाचे हात भरले रक्ताने!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल