ठाणे : सर्वाधिक महापालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीपासून केली आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि बदलापूर या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. अंबरनाथमध्ये खरी लढत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. मात्र शेवटच्या क्षणाला ही युती फिस्कटल्याने शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला असून बदलापूरमध्ये शिेंदेच्या शिवसेनेने खातं उघडलं आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
बदलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खाते उघडलं असून शिवसेनेच्या शीतल राऊत बिनविरोध निवडून आल्या आहेत.प्रभाग क्रमांक 19 मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपच्या प्रज्ञा सूर्यवंशी यांनी माघार घेतली असून दोन जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा फटका बसू नये, यासाठी भाजप आणि शिंदे गटाचेकडून जोर लावण्यात आला आहे. जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची काल गुरुवारी रात्रीपासुन मनधरणी सुरु होती.
निवडणुकीची रंगत वाढली
बदलापूरमधील निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. बदलापूरच्या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू असून भाजप आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. नगर परिषदेत पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असून बदलापुरात 24 पॅनलमधून तब्बल 49 लोकप्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची आहे.
अंबरनाथमध्ये काय चित्र आहे?
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये 59 जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. आता पाच जागांवरील उमेदावरांचे अर्ज बाद झाल्याने आता भाजपला 54 जागांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मिळालेल्या या झटक्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या देखील एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. 3A या वॅार्डातून शिवसेनेच्या एका उमेदवाराचा अर्ज देखील बाद करण्यात आला आहे.
