ओव्हर हेड वायरीच्या खांब्यावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा आरपीएफ पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा रक्षकांनी बराचसा प्रयत्न केला. पण तो काही खाली उतरतच नव्हता. खांब्यावर असताना त्याला ओव्हर हेड वायरीचा धक्का लागल्यामुळे तो खाली पडला. त्याला तात्काळ केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्याची तब्येत गंभीर असल्यामुळे उपचारासाठी त्याला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
advertisement
ओव्हर हेड वायरीच्या खांब्यावर चढलेल्या व्यक्तीला विजेचा झटका बसला. त्याला विजेचा झटका लागल्यामुळे तो खाली पडला. थेट खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. ती व्यक्ती खाली कोसळताच त्याला तात्काळ केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. लगेचच तात्काळ त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
त्याच्यावर काही थोडक्यात उपचार करून त्याला तात्काळ सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळेच त्याला मुंबईमध्ये पुढच्या उपचारासाठी नेलं आहे. त्या व्यक्तीने ओव्हर हेड वायरीच्या खांब्यावर चढून हे कृत्य का केले? त्याला आत्महत्या करायची होती का? या सर्व प्रश्नांची उकल कल्याण रेल्वे पोलीसांकडून केली जात आहे. सोबतच पोलिसांकडून त्याची ओळख सुद्धा पटवली जात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच त्या व्यक्तीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं? याचं कारण समोर येणार आहे.
