TRENDING:

Shocking : पालकांच्या एका चुकीची मोठी किंमत! दोन मित्रांचा घात झाला; दिव्यातील मुलांसोबत घडलं काय?

Last Updated:

Thane Accident : पालकांनो जर तुमच्या ही घरात तुमची मुलं असतील तर ही बातमी वाचा. ठाणे शहरातून एक धक्कादायक पण तितकाच दुर्देवी घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं किती धोकादायक ठरु शकतं हे आता पुन्हा एकदा समोर आले आहे. जिथं घरच्यांना त्यांच्या तरुण मुलांना गमवाव लागल असून यात पालकांवरही प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. नेमका हा प्रकार कोणत्या शहरातील आहे आणि काय घडलं ते जाणून घेऊयात.
Bhiwandi Mankoli bridge motorcycle crash incident
Bhiwandi Mankoli bridge motorcycle crash incident
advertisement

पुलावर होत्याचं नव्हतं झालं

ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातील दोन अल्पवयीन तरुणांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऋषिकेश राजेश जाधव आणि आयुष विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण दिवा शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ऋषिकेश आणि आयुष हे आपल्या काही मित्रांसोबत चार दुचाकींवरून फिरण्यासाठी बाहेर गेले होते. ते भिवंडी जवळील माणकोली पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

ही बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली आहे. दोन्ही तरुण अविवाहित होते आणि शिक्षण घेत होते असे सांगितले जात आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : पालकांच्या एका चुकीची मोठी किंमत! दोन मित्रांचा घात झाला; दिव्यातील मुलांसोबत घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल