प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
ही विशेष गाडी एकूण आठ फेऱ्या पूर्ण करणार आहे. मुंबई सेंट्रल-भगत की कोठी गाडी दर बुधवारी रात्री 11.45 वाजता पालघरहून पुढे रवाना होईल. तर भगत की कोठी–मुंबई सेंट्रल ही गाडी दर शनिवारी पहाटे 2.20 वाजता पालघर स्थानकावरून सुटेल, त्यामुळे राजस्थान किंवा गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा थांबा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
या गाडीचा बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, साबरमती, पालनपूर, अबू आणि अबू रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरील विविध प्रमुख शहरांकडे सोयीस्करपणे प्रवास करणे शक्य होणार आहे.
या विशेष गाडीमध्ये प्रवाशांसाठी सर्व आवश्यक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रथम श्रेणी वातानुकूलित, एसी 2-टियर, एसी 3-टियर आणि एसी 3-टियर इकॉनॉमी अशा आधुनिक डब्यांचा समावेश यात आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात आरामदायी अनुभव मिळणार आहे.
पालघरकरांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. वेळापत्रक आणि इतर माहिती पाहण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात www.enquiry.indianrail.gov.in यावर भेट द्यावी.
