अमरावती : हिवाळ्यामध्ये पौष्टीक पदार्थ सेवन करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतात. सद्यस्थितीमध्ये आहारातून ज्वारी, बाजरी आणि त्यासारखेच काही पदार्थ बाद झाले आहेत. पण, ते पौष्टीक असल्याने आहारात घेणे आवश्यक आहे. बाजरी हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे बाजरीची चटपटीत खिचडी तुम्ही आहारात घेऊ शकता. ती कशी बनवायची याबद्दलच अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी माहिती दिली आहे.