TRENDING:

पापड विक्रीतून महिन्याला १ लाखांची कमाई! संभाजीनगरच्या कल्पना यांनी उभारलं साम्राज्य !

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील करमाड येथील कल्पना गायकवाड यांनी उमेद रमाई महिला स्वयंसहायता समुहाअंतर्गत 12 प्रकारच्या पापडांच्या विक्रीचा व्यवसाय उभारला आहे. त्या स्वतः पापडाची निर्मिती करतात आणि विक्री करतात. त्यामध्ये तांदळाचे पापड, साबुदाणा पापड, बटाटा पापड, ओनियन रिंगसह विविध प्रकारच्या पापडांची स्टॉलच्या माध्यमातून तसेच घरून देखील विक्री केली जाते. त्यांचे स्टॉल ग्रामीण भागासह छत्रपती संभाजीनगर शहरातही लावलेले असतात. या व्यवसायामुळे 13 महिलांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे कल्पना गायकवाड यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: Jan 14, 2026, 13:34 IST
Advertisement

पुण्यातील 'या' बेकरीत मिळतायत चॉकलेटचे तिळगुळ; परंपरा आणि आधुनिकतेचा गोड संगम

पुणे

पुणे : मकर संक्रांती म्हणजे गोडवा, आनंद आणि आपुलकीचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार तिळगुळ वाटण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. मात्र, काळानुरूप बदल स्वीकारत पुण्यातील सोमवार पेठेतील मूर्ती बेकरीने या पारंपरिक सणाला आधुनिकतेची गोड जोड दिली आहे. गेली अनेक वर्ष विविध सणांनिमित्त चॉकलेटचे खास पदार्थ बनवणारी ही बेकरी मकर संक्रांतीसाठी खास तिळगुळ चॉकलेट तयार करत असून ते पुणेकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

Last Updated: Jan 14, 2026, 13:46 IST

5.59 लाखांत 5-स्टार सुरक्षा! टाटा पंचचा नवीन अवतार; काय आहेत फीचर्स? Video

मुंबई : टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय मायक्रो SUV Tata Punch 2026 Facelift आज अधिकृतपणे लॉन्च केली आहे. सुरक्षितता, परवडणारी किंमत आणि मजबूत बांधणी यासाठी ओळखली जाणारी Tata Punch आता नव्या लुकमध्ये आणि अधिक आधुनिक फीचर्ससह ग्राहकांसमोर आली आहे. आजपासून म्हणजेच 13 जानेवारी 2026 पासून या गाडीची बुकिंग सुरू झाली असून, सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.59 लाख ठेवण्यात आली आहे.

Last Updated: Jan 14, 2026, 13:13 IST
Advertisement

टॉइलेट मधून फ्लश केल्याने पैसे गायब, सुर्यकांत कोळींचा ठाकरे गटावर पैसे वाटपाचा आरोप , VIDEO

वरळीत कोळीवाड्यात पैसे वाटपाचा आरोप ठाकरे पक्षावर झाला. अपक्ष उमेदवार सुर्यकांत कोळी यांनी हा आरोप ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर केला आहे. मात्र पैसे टॉइलेट मधून फ्लश केल्याने पुरावा सापडला नाही.

Last Updated: Jan 13, 2026, 21:12 IST

Election Report : ठाकरे बंधूंची प्रचारात कशी आखली होती रणनीती, BMC मध्ये बाजी मारणार का?

ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यात सगळ्यांचं लक्ष हे पालिकेत पुन्हा कोण येणार यावर आहे. त्यातच आता ठाकरे बंधूंची प्रचाराची रणनीती नेमकी काय आहे ? हा विरोधकांना पडलेला प्रश्न. ठाकरे बंधूंनी आपआपल्या पक्षाच्या शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांना उत्साह , जोश दिला आहे.

Last Updated: Jan 13, 2026, 21:13 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पापड विक्रीतून महिन्याला १ लाखांची कमाई! संभाजीनगरच्या कल्पना यांनी उभारलं साम्राज्य !
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल