छत्रपती संभाजीनगर : आता लवकरच पावसाळा संपून हिवाळा ऋतू प्रारंभ होतोय. थंडीच्या दिवसांमध्ये उत्तम आरोग्यासाठी आहारही आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण आपल्या घरीच आरोग्यदायी पदार्थ बनवू शकतो. यात नाचणीच्या पिठापासून मंचाव सूप हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असणारं हे सूप कसं बनवायचं? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी माहिती दिलीये.