TRENDING:

घरगुती तेलघाणा व्यवसाय कसा सुरू कराल? तेल काढण्याची प्रक्रिया कशी? किती येतो खर्च? Video

Food

छत्रपती संभाजीनगर : शुद्ध, भेसळमुक्त आणि आरोग्यदायी तेलाला सध्या बाजारात मोठी मागणी वाढताना दिसत आहे. शेंगदाणे, करडी, जवस, करडई, सोयाबीन यांसारख्या विविध तेलांची घरगुती पद्धतीने निर्मिती करण्याकडे अनेक नागरिकांचा कल वाढला आहे. पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तेलघाणा यंत्र या कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत हे यंत्र वापरून दर्जेदार तेल काढता येते. ग्रामीण तसेच शहरी भागात तेलघाणा व्यवसाय हा उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरत आहे. तेलघाणा यंत्राचा वापर कसा करायचा, त्याची क्षमता किती आहे आणि व्यवसाय सुरू करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती तेलघाणा यंत्र विक्रेते योगेश सुनेवाड यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: Jan 17, 2026, 14:24 IST
Advertisement

'..म्हणून मी हसण्याची रिअॅक्शन दिली', नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, VIDEO

भाजपचे नेते नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मुख्य्यमंत्री असताना मुंबई आयुक्तांना फोन करुन राणेंचं घर तोडा सांगायचे.म्हणून काल मी त्याला स्पेशल रिअॅक्शन दिली जेणेकरुन त्यांना आठवणीत राहील, आता मातोश्री दोनची बारी आहे.सगळीकडे हिरवी चादर कुन ठेवलेली आहे तिकडे देवा भाऊचा बुल्डोजर चालणार.

Last Updated: Jan 17, 2026, 17:38 IST

दादरच्या शिवाजी पार्कात अवघ्या १० रुपयांपासून 'इको-फ्रेंडली' बॅग्स; पाहा खास कलेक्शन

मुंबई : मुंबईच्या दादर परिसरात सध्या एक अनोखा आणि आकर्षक स्टॉल नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. गोखले रोड, शिवाजी पार्क येथे ओव्हन फ्रेश या रेस्टॉरंटच्या बाहेर उभारण्यात आलेल्या या स्टॉलवर अवघ्या 10 रुपयांपासून पर्यावरणपूरक कापडी बॅग्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कमी किमतीत, टिकाऊ आणि स्टायलिश असल्यामुळे या बॅग्सना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 17:11 IST
Advertisement

मुंबईत सेनेचा महापौर होईल का ? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसोबत संवाद साधत म्हणाले, "उमेदवारांना पैशाची आमिष देण्यात आली. जबरदस्तीने उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या,या सगळ्या गुंडागर्दीला न जुमानता मतदारांनी मतदान केले आहे ते म्हणजे लोकशाहीचे रक्षक आहेत.मुंबईत आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच आणि आजही आहे."

Last Updated: Jan 17, 2026, 16:58 IST

मेथी पराठा कडू होतोय? 'या' खास टिप्स वापरून बनवा मऊ आणि खमंग पराठे

मुंबई : सकाळची सुरुवात जर चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक जातो. पण रोज रोज काय नवीन बनवायचं जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि जास्त वेळही लागणार नाही, हा प्रश्न प्रत्येक घरात असतोच. अशावेळी पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा परफेक्ट मेळ असलेला मेथी पराठा हा एक उत्तम पर्याय ठरतो. मेथीमुळे शरीराला फायबर, आयर्न मिळतं. विशेष म्हणजे हा पराठा झटपट तयार होतो, डब्यासाठीही उत्तम आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 16:58 IST
Advertisement

EVM मशीन बदलली,भाजप उमेदवाराच्या विजयावर आक्षेप ,वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, VIDEO

छ. संभाजीनगरमध्ये वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. आमदार नारायण कुसे यांच्या बहिणीला चुकिच्या पद्धतीने विजयी घोषित केल्यानंतर वंचितने आक्षेप घेतला होता.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आहे. वंचित कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुकुंदवाडी परिसरात ही गर्दी केली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मतमोजणीमध्ये गैरप्रकार कुरुन ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप केला. त्यानंतर नेते सुजात आंबेडकर यांनी फोन वरुन संपर्क साधला आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 16:35 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
घरगुती तेलघाणा व्यवसाय कसा सुरू कराल? तेल काढण्याची प्रक्रिया कशी? किती येतो खर्च? Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल