सोलापूर : सोलापुरी जेवणाच्या ताटात तुम्हाला इतर पदार्थांबरोबर तीन पदार्थ निश्चित दिसतील. ते पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी, शेंगादाण्याची चटणी आणि मिरचीचा ठेचा. घराघरात असणारा हा मेनू जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावरील विविध हॉटेल या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. पण या पदार्थांना कोंडीच्या नसले बंधूनी ब्रँड बनवले आहे. आज नसले बंधूंची शेंगा चटणीबरोबर इतर उत्पादने देशातील अग्रेसर मॉलमध्ये विकले जात आहेत. परदेशातही या शेंगा चटणीची चव चाखली जाते.