छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. कोणी दुधाचा चहा घेतात किंवा कोणी काळा चहा घेतात. तर काहीजण ग्रीन टी घेतात. पण या सर्व चहापेक्षा अत्यंत फायदेशीर असा ठरतो तो म्हणजे निळा चहा. त्याला ब्ल्यू टी म्हटले जाते. हा ब्ल्यू टी घेण्याचे अनेक असे फायदे आहेत. ते नेमके कोणते, तेच आपण जाणून घेणार आहोत. या चहाचे काय फायदे होतात याविषयी आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.