चुपsss चुपsss चुपsss, राकेश - अनुश्री पुन्हा आमने सामने, BBM 4 च्या घरात आता कोणता नवी ड्रामा?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss मराठीमध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात मोठे भांडण, दोघे एकमेकाला चुप बसण्यास सांगत आहेत, घरातील वातावरण तापले, प्रेक्षकांचे लक्ष या वादाकडे.
advertisement
1/11

या आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात कडाक्यात भांडण झालं. अनुश्रीने राकेशवर नको नको ते आरोप केले. ज्यामुळे राकेश खूप हर्ट झाला.
advertisement
2/11
अनुश्रीला बोलण्याची पद्धत नाही असं म्हणत बाहेर सोशल मीडियावरही देखील तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. दरम्यान पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात राकेश आणि अनुश्री आमने सामने आले आहेत.
advertisement
3/11
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवीन प्रोमोमध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात प्रचंड मोठे भांडण झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
4/11
प्रोमोमध्ये राकेश कमालीचा संतापलेला दिसत असून तो घरातील कामाच्या मुद्द्यावरून अनुश्रीवर निशाणा साधताना दिसतोय.
advertisement
5/11
"घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे?" असा प्रश्न राकेशने उपस्थित केला आहे. राकेशचा हा आक्रमक अवतार पाहून घरातील इतर सदस्यही अवाक झाले आहेत.
advertisement
6/11
दुसरीकडे अनुश्रीनेही राकेशला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोघांमध्ये एकमेकांवर ओरडण्याची आणि 'चूप' राहण्याची स्पर्धाच लागली आहे.
advertisement
7/11
राकेश वारंवार तिला गप्प राहण्यास सांगत असताना अनुश्रीनेही त्याला तितक्याच प्रखरपणे उत्तर दिले आहे.
advertisement
8/11
घरात शांत राहणारा राकेश यावेळी इतका का चिडला? या भांडणात कोणाची बोलती होणार बंद? हे पाहणे आता रंजक ठरणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
advertisement
9/11
अनुश्रीने याआधी प्राजक्ता शुक्रेलाही शिव्या दिल्या. ज्यामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. दिपालीने तिला समजावलं होतं. घरात सगळं शांत झालेलं असताना पुन्हा एकदा वाद पाहायला मिळणार आहेत.
advertisement
10/11
अनुश्री मानेची घरात बोलण्याची भाषा, भांडण, समोरच्याचा आदर न ठेवणं या सगळ्यावर घरातील सगळेच नाराज आहेत. टोळी गँगच्या सगळ्याच सदस्यांवर घरातील इतर लोक नाराज आहेत.
advertisement
11/11
अशातच राकेश आणि अनुश्रीचं पुन्हा भांडण झालं. दोघे एकमेकाला चुप बसण्यास सांगत आहेत. पण दोघांमधील कोण कोणाला शांत करणार हे पाहणं आजच्या भागात इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
चुपsss चुपsss चुपsss, राकेश - अनुश्री पुन्हा आमने सामने, BBM 4 च्या घरात आता कोणता नवी ड्रामा?