
कोल्हापूर : प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक घटक आहे. स्नायूंच्या विकासात, टिश्यूजची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात प्रोटीन हे महत्त्वाची भूमिका बजावते. मांसाहारी पदार्थ हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, परंतु त्यामध्ये पोषक तत्व जास्त प्रमाणात असते. निरोगी राहण्यासाठी शरीरामध्ये योग्य प्रोटीन पातळीची आवश्यकता भासते. जास्त व्यायाम आणि मेहनत करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीन रिच फूड अधिक प्रमाणात घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून देण्यात येतो. यामुळे हाडे आणि केसांना अधिक मजबूती मिळते आणि त्वचा देखील हेल्दी राहायला मदत मिळते. अशा काही मांसाहारी पदार्थांबद्दल आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे यांनी माहिती दिली आहे जे तुम्हाला भरभरून प्रोटीन्स देतील.