TRENDING:

Perfect Tea : चहामध्ये साखर-आलं योग्यवेळी टाकणं आवश्यक, फक्त हा नियम पाळा; बनेल परफेक्ट चहा

Last Updated:
When to add ginger and sugar to make perfect tea : चहा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची विश्रांती, गरमागरम चहा मिळाला की मन ताजेतवाने होतं. पण अनेकदा घरी बनवलेला चहा अपेक्षेइतका चवदार लागत नाही. कारण बहुतेक वेळा चहा करताना आपण सगळे साहित्य एकत्र टाकतो आणि चहाची खरी चव बिघडते.
advertisement
1/9
चहामध्ये साखर-आलं योग्यवेळी टाकणं आवश्यक, फक्त हा नियम पाळा; बनेल परफेक्ट चहा
परफेक्ट चहा बनवण्यासाठी फक्त चहा पावडर चांगली असली की पुरेसं नसतं, तर आलं, साखर आणि दूध योग्य वेळी घालणंही तितकंच महत्त्वाचं असतं. योग्य पद्धतीने चहा बनवला तर त्याची चव अप्रतिम होतेच, शिवाय आरोग्यदायी फायदेही अधिक मिळतात. चला तर मग जाणून घेऊया, परफेक्ट चहा कसा बनवायचा. तसेच आलं आणि साखर नेमकी कधी घालायची.
advertisement
2/9
सर्वात आधी पाणी आणि चहा पावडरचा क्रम योग्य असणं गरजेचं आहे. चहा करताना आधी पाणी उकळायला ठेवा. पाण्याला हलकासा उकळा आला की त्यात चहा पावडर घाला. यामुळे चहाची चव हळूहळू पाण्यात मिसळते आणि त्याचा खरा फ्लेवर बाहेर येतो. जर तुम्हाला कडक चहा आवडत असेल तर चहा पावडर 3 ते 4 मिनिटं उकळू द्या, तर हलक्या चहासाठी 1 ते 2 मिनिटं पुरेशी असतात.
advertisement
3/9
आलं कधी घालायचं हे अनेकांना माहिती नसतं. चहा पावडर घातल्यानंतरच आलं घालणं योग्य ठरतं. आलं फार वेळ उकळल्यास त्याची चव कडू होते आणि चहा बिघडू शकतो. त्यामुळे अदरक छोटे तुकडे करून किंवा किसून घाला, जेणेकरून त्याची टेस्ट लवकर येईल.
advertisement
4/9
आलं घातल्यानंतर ते जास्तीत जास्त 2 मिनिटांपर्यंतच उकळू द्यावी. यापेक्षा जास्त वेळ उकळल्यास चहा जास्त तिखट होऊ शकतो आणि चहाची चव दबली जाते. योग्य वेळेवर घातलेलं आलं चहाला उत्तम चव आणि सुगंध देते.
advertisement
5/9
दूध घालण्याची वेळही तितकीच महत्त्वाची आहे. चहा पावडर आणि आलं नीट उकळून त्यांची चव पाण्यात उतरल्यावरच दूध घालावं. दूध घातल्यानंतर चहा फक्त 1 ते 2 मिनिटं उकळावा. यामुळे दूध आणि चहाचा योग्य समतोल राहतो. तसेच चहा ना फिक्का लागतो ना जास्त कडू.
advertisement
6/9
साखर नेहमी सर्वात शेवटी घालावी, ही चहा बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. चहा जवळपास तयार झाला की, शेवटी साखर घालून फक्त 30 सेकंद उकळा. सुरुवातीलाच साखर घातल्यास तिची गोडी चहापत्तीची मूळ चव दाबून टाकते. मंद आचेवर साखर विरघळू दिल्यास चहा अधिक चविष्ट लागतो.
advertisement
7/9
परफेक्ट चहा बनवताना काही चुका टाळणंही गरजेचं आहे. जास्त आलं घातल्याने चहा कडू होऊ शकतो. साखर सुरुवातीला घातल्यास चहाची चव बिघडते. तसेच चहा फार वेळ उकळल्यास तो जास्त कडक आणि कडू लागतो. आलं खूप आधी घातल्यानेही त्याची कडू चव वाढते.
advertisement
8/9
तुम्हाला चहाची चव अजून खास बनवायची असेल तर काही अतिरिक्त पदार्थ वापरू शकता. वेलचीमुळे चहाला हलकी गोडसर चव आणि सुगंध येतो. दालचिनी चहाला मसालेदार आणि आरोग्यदायी बनवते. तुळस सर्दी-खोकल्यात आराम देते तर काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. योग्य पद्धतीने बनवलेला चहा प्रत्येक घोटात आनंद देतो.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Perfect Tea : चहामध्ये साखर-आलं योग्यवेळी टाकणं आवश्यक, फक्त हा नियम पाळा; बनेल परफेक्ट चहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल