TRENDING:

जया एकादशीचा उपवास सोडताना चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, तुमच्या एका चुकीमुळे कुटुंबावर ओढवेल संकट!

Last Updated:
जया एकादशी 29 जानेवारी 2026 रोजी साजरी होणार असून भात, मसूर डाळ, कांदा, लसूण, मांस, मद्य, पांढरे मीठ, वांगी व मध वर्ज्य आहेत. नियम पाळल्यास पुण्य आणि वैकुंठ प्राप्ती.
advertisement
1/7
जया एकादशीचा उपवास सोडताना चुकूनही खाऊ नका 'हे', चुकीमुळे कुटुंबावर ओढवेल संकट!
29 जानेवारी 2026 रोजी 'जया एकादशी' साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. पौराणिक कथेनुसार, हे व्रत पाळल्याने मानवाला पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते.
advertisement
2/7
मात्र, एकादशीचे व्रत करताना आणि त्या दिवशी सामान्य जीवन जगताना काही कडक नियम पाळणे आवश्यक असते. जर तुम्ही जया एकादशीला चुकूनही खालील चुका केल्या, तर तुमच्या पुण्याचा क्षय होऊ शकतो आणि तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही.
advertisement
3/7
भात किंवा तांदळाचे पदार्थ: एकादशीला भात खाणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. पौराणिक कथेनुसार, महर्षी मेधा यांनी शरीर त्याग केला तेव्हा त्यांचे अंश पृथ्वीत गेले आणि त्यातून तांदूळ उत्पन्न झाला. म्हणून एकादशीला भात खाणे म्हणजे महर्षींच्या अंशाचे भक्षण करणे मानले जाते.
advertisement
4/7
मसूर डाळ आणि कडधान्ये: शास्त्रानुसार जया एकादशीला मसूर डाळ खाणे वर्ज्य आहे. मसूर डाळीला तामसिक मानले जाते. तसेच हरभरा, उडीद आणि वाटाणे यांसारखी कडधान्येही या दिवशी खाऊ नयेत. तामसिक अन्नामुळे कुटुंबात चिडचिड आणि वादविवाद वाढतात. शांतीचा अभाव निर्माण होतो.
advertisement
5/7
कांदा, लसूण आणि तामसिक आहार: कांदा आणि लसूण हे जमिनीत वाढणारे पदार्थ असल्याने आणि त्यांच्या उग्र वासामुळे ते पूजेच्या दिवशी वर्ज्य आहेत. मांस, मद्य आणि तंबाखू यांपासून पूर्णपणे दूर राहावे. अशा पदार्थांच्या सेवनाने घरातील सात्त्विकता नष्ट होते आणि देवी लक्ष्मी घराबाहेर जाते, ज्यामुळे आर्थिक चणचण भासते.
advertisement
6/7
पांढरे मीठ: एकादशीच्या उपवासात साधे समुद्री मीठ खाणे निषिद्ध मानले जाते. त्याऐवजी 'सेंधव मीठ' वापरावे. नियमबाह्य आहार घेतल्याने व्रताचे पुण्य मिळत नाही आणि कुटुंबातील सदस्यांना शारीरिक व्याधी जडू शकतात.
advertisement
7/7
वांगी आणि मध: अनेक ग्रंथांमध्ये एकादशीला वांगी आणि मध खाणे वर्ज्य सांगितले आहे. हे पदार्थ प्रकृतीने उष्ण असतात आणि ते उपवासाच्या सात्त्विकतेला बाधा आणतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
जया एकादशीचा उपवास सोडताना चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, तुमच्या एका चुकीमुळे कुटुंबावर ओढवेल संकट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल