TRENDING:

Mobile Change : आपला फोनच देतो जुना झाल्याचे संकेत, असं काही दिसलं तर लगेच फोन बदला; नाहीतर होईल नुकसान

Last Updated:
Sign to change Mobile : आपल्यापैकी काही जण असे असतात जे दरवर्षी फोन बदलतात तर काही जण फोन अक्षरशः 'खराब' होईपर्यंत वापरतात.
advertisement
1/9
आपला फोनच देतो जुना झाल्याचे संकेत, असं काही दिसलं तर लगेच फोन बदला
आजच्या काळात स्मार्टफोन हे आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. पण गेल्या काही काळात नवीन स्मार्टफोनच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे, जोपर्यंत जुना फोन पूर्णपणे दम टाकत नाही, तोपर्यंत नवीन फोन न घेण्याकडे अनेकांचा कल असतो. आपल्यापैकी काही जण असे असतात जे दरवर्षी मॉडेल बदलतात, तर काही जण फोन अक्षरशः 'खराब' होईपर्यंत वापरतात.
advertisement
2/9
पण तुमचा जुना फोन किती काळ वापरणे सुरक्षित आहे? केवळ तो 'चालतोय' म्हणून वापरत राहणे योग्य आहे का? की काही अंतर्गत बदल तुम्हाला धोक्याचा इशारा देत आहेत? चला जाणून घेऊया, तुमचा जुना फोन बदलण्याची योग्य वेळ नेमकी कोणती.
advertisement
3/9
1. सॉफ्टवेअर अपडेट्स: सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वाचा निकषअनेकांना वाटतं की फोनचा कॅमेरा किंवा स्क्रीन नीट असेल तर फोन चांगला आहे. पण तसं नाही. फोन बदलण्यासाठी सर्वात आधी सॉफ्टवेअर अपडेट्स तपासणे गरजेचे आहे. जर तुमच्या फोनला कंपन्यांकडून 'सिक्युरिटी पॅचेस' मिळणे बंद झाले असेल, तर तुमचा फोन हॅक होण्याचा धोका वाढतो. यामुळे डेटा लीक आणि बँकिंग फ्रॉड सारख्या घटना घडू शकतात.
advertisement
4/9
सध्या ॲपल (Apple) 5 वर्षांपर्यंत, तर गुगल आणि सॅमसंग सारख्या कंपन्या 7 वर्षांपर्यंत अपडेट्स देण्याचे आश्वासन देत आहेत. जर तुमचा फोन 3-4 वर्षांपूर्वीचा असेल आणि त्याला अजूनही अपडेट्स मिळत असतील, तर तुम्ही तो बिनधास्त वापरू शकता. पण अपडेट्स बंद झाले असतील, तर नवीन फोन घेण्याचा विचार करा.
advertisement
5/9
2. ॲप्सची सुसंगतता (App Compatibility)जसा काळ पुढे जातो, तसे व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा बँकिंग ॲप्स जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करतात. जर तुमच्या फोनमध्ये महत्त्वाची ॲप्स स्लो चालत असतील किंवा वारंवार क्रॅश होत असतील, तर हे संकेत आहेत की तुमच्या फोनचे हार्डवेअर आता नवीन सॉफ्टवेअरचा भार पेलू शकत नाहीये.
advertisement
6/9
3. बॅटरीचे संकेत ओळखातुमच्या फोनची बॅटरी ही त्याच्या आयुष्याचा आरसा असते. प्रत्येक बॅटरीची 'चार्ज सायकल' ठरलेली असते. साधारणपणे 3 ते 4 वर्षांच्या वापरानंतर बॅटरीची क्षमता कमी होते. फोन 100% चार्ज करूनही तो काही तासांतच डिस्चार्ज होत असेल, तर त्याचा परिणाम फोनच्या एकूण परफॉर्मन्सवर होतो.
advertisement
7/9
चार्जिंगची कटकट: जर तुम्हाला दिवसातून 3-4 वेळा फोन चार्ज करावा लागत असेल, तर ते केवळ त्रासाचेच नाही तर फोनच्या मदरबोर्डसाठीही हानिकारक ठरू शकते. अशा वेळी बॅटरी बदलण्यापेक्षा नवीन फोन घेणे कधीही फायदेशीर ठरते.
advertisement
8/9
4. परफॉर्मन्स आणि स्लो होणारा वेगजर तुमचा फोन फोटो क्लिक करताना हँग होत असेल, कीबोर्ड उघडायला वेळ लागत असेल किंवा साधे कॉल उचलतानाही स्क्रीन गोठत (Freeze) असेल, तर समजून जा की प्रोसेसर आता थकलेला आहे. अशा परिस्थितीत फोन वापरणे तुमच्या कामात अडथळा आणू शकते.
advertisement
9/9
थोडक्यात सांगायचे तर, जर तुमचा फोन 3-4 वर्ष जुना आहे पण त्याला नियमित अपडेट्स मिळत आहेत आणि बॅटरी बॅकअप चांगला आहे, तर तुम्हाला घाई करण्याची गरज नाही. मात्र, जर अपडेट्स मिळणे बंद झाले असेल आणि बॅटरी दगा देत असेल, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन स्मार्टफोनमध्ये गुंतवणूक करणेच शहाणपणाचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Mobile Change : आपला फोनच देतो जुना झाल्याचे संकेत, असं काही दिसलं तर लगेच फोन बदला; नाहीतर होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल