TRENDING:

स्मृती मानधनासोबत लग्न मोडलं, पलाश मुच्छलचं नवीन कांड समोर; सांगलीत तक्रार दाखल

Last Updated:
Palash Muchchal : स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर आता पलाश मुच्छलचं नवीन कांड समोर आलं आहे. पलाश विरोधात सांगलीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे?
advertisement
1/9
स्मृती मानधनासोबत लग्न मोडलं, पलाश मुच्छलचं नवीन कांड समोर; सांगलीत तक्रार दाखल
संगीतकार पलाश मुच्छल सातत्याचं चर्चेत आहे. क्रिकेटर स्मृती मानधनाबरोबर त्याचं लग्न मोडलं. दोघांच्या मोडलेल्या लग्नाची अजूनही चर्चा होतेय. लग्नाच्या काही तास आधी घडलेला संपूर्ण प्रकार खूपच शॉकिंग होता.
advertisement
2/9
दरम्यान स्मृती आणि पलाश यांचं लग्न का मोडलं यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
3/9
दरम्यान स्मृतीसोबत लग्न मोडल्यानंतर पलाशचा एक नवी कांड समोर आला आहे. पलाशविरोधात सांगलीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
advertisement
4/9
पलाश मुच्छल यांच्याविरोधात सांगलीत आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सांगलीतील विज्ञान माने या तरुणाने थेट सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पलाश मुच्छल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
5/9
सिनेमात काम देण्याचं आणि प्रोड्युसर म्हणून गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप विज्ञान माने यांनी केला आहे. सध्या या प्रकरणी केवळ तक्रार दाखल असून अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
advertisement
6/9
पलाशने 'नजरिया' या सिनेमाचं दिग्दर्शन आपण करणार असून तू सिनेमाचा प्रोड्यूसर म्हणून गुंतवणूक कर. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर त्याच्यातून 25 लाख गुंतवणूकीवर 12 लाख रुपयापर्यंत मोबदला मिळणार असल्याचं पलाशने विज्ञान माने यांना सांगितले होते. तसेच तो सिनेमातमध्ये एक्टिंगचं काम देखील देणार होता असं विज्ञान माने यांने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
7/9
पलाशने विश्वासात घेऊन माझ्याकडून वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये घेऊन माझा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केला असल्याचा आरोप विज्ञान माने यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
advertisement
8/9
आर्थिक फसवणूक केल्याबाबत पलाश मुच्छल यांच्यावर आयपीसी 406, 420 प्रमाणे विज्ञान माने यांने पोलिस अधिक्षकांच्या कडे तक्रार दिली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षकांची संपर्क साधला असता त्यांनी फक्त तक्रार दिली आहे गुन्हा दाखल नाही असेही सांगितला आहे आज याबाबत अकरा वाजता विज्ञान माने प्रेस घेणार आहे की मला असं फसवलं असून त्याबद्दल सांगणार आहे.
advertisement
9/9
त्याचप्रमाणे पलाश मुच्छलचा आगामी सिनेमा येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक, संगीतकारही तोच असल्याचं सांगण्यात आलं आहे. सिनेमाचं शूटिंग मुंबईत होणार असून अभिनेता श्रेयस तळपदे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असल्याचा फोटो देखील समोर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्मृती मानधनासोबत लग्न मोडलं, पलाश मुच्छलचं नवीन कांड समोर; सांगलीत तक्रार दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल