IPL 2026 : मुस्ताफिजूर गेला पण शेजाऱ्याने पाठवला 18 कोटींचा ट्रॉफी जिंकवणारा प्लेयर! अजिंक्य रहाणेसाठी गुड न्यूज
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Matheesha Pathirana likely to joined KKR : कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मथीशा पाथिराणा लवकरच संघ जाईन्ड करेल.
advertisement
1/9

बांगलादेशी बॉलर मुस्ताफिजूर रहमान याच्यावर आयपीएलमधून बंदी घातल्यानंतर आता केकेआरसाठी गुड न्यूज समोर आली आहे. केकेआरमध्ये एका स्टार बॉलरची एन्ट्री झालीये.
advertisement
2/9
केकेआरला आयपीएलआधीच दोन धक्के बसले होते. एक मुस्ताफिजूर बाहेर गेला तर दुसरीकडे हर्षित राणा दुखापतीमुळे बाहेर आहे. अशातच आता केकेआरसाठी श्रीलंकेमधून गुड न्यूज समोर आली आहे.
advertisement
3/9
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने (SLC) वेगवान बॉलर मथीशा पाथिराणा पूर्णपणे फिट असल्याचे घोषित केलं असून त्याला IPL खेळण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे.
advertisement
4/9
या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून केकेआरच्या गोटात असलेली चिंतेची टाळी आता दूर झाली असून, टीमच्या बॉलिंग अटॅकला मोठी मजबूती मिळणार आहे. कॅप्टन अजिंक्य रहाणेला मोठा दिलासा मिळालाय.
advertisement
5/9
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव बंदुला दिसानायक यांनी पीटीआयशी (PTI) बोलताना स्पष्ट केले की, पाथिराणाने आपले रिहॅब पूर्ण केले असून त्याला एनओसी (NOC) देण्यात आली आहे. "आमच्या माहितीनुसार तो आता पूर्णपणे फिट आहे
advertisement
6/9
"आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्याला परवानगी दिली आहे," असे दिसानायक यांनी म्हटलं आहे. मात्र, तो प्रत्यक्ष मॅच खेळण्यासाठी किती तयार आहे, याचा अंतिम निर्णय आता केकेआर मॅनेजमेंटला घ्यावा लागणार आहे.
advertisement
7/9
टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच दरम्यान पाथिराणाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता, परंतु आता त्याने रिकव्हरी पूर्ण केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 18 कोटी रुपयांना घेतलं होतं.
advertisement
8/9
पाथिराणा अद्याप स्क्वॉडमध्ये कधी सामील होणार, याची अधिकृत तारीख समोर आलेली नाही, मात्र 25 मार्चला टीम मुंबईला रवाना होण्यापूर्वी तो येण्याची शक्यता आहे. मात्र, तो मुंबईविरुद्घची मॅच मुकण्याची शक्यता आहे.
advertisement
9/9
दरम्यान, केकेआरची पहिली मॅच 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 2 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानात सामना रंगणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुस्ताफिजूर गेला पण शेजाऱ्याने पाठवला 18 कोटींचा ट्रॉफी जिंकवणारा प्लेयर! अजिंक्य रहाणेसाठी गुड न्यूज