टरबूज आणि खरबूज ही फळे आहारात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यातून शरीराला भरपूर पोषण मिळते. मात्र, अनेक लोकांमध्ये या फळांवर मीठ टाकून खाण्याची सवय दिसून येते. मीठ टाकल्याने चव वाढते हे खरे असले तरी, ही सवय आरोग्यासाठी कितपत योग्य आहे याबद्दल अनेकांना माहिती नसते. मीठ टाकल्याने शरीरावर काय परिणाम होतो, तसेच ही फळं कशी खावीत याबद्दलचा तुमचा गोंधळ दूर करा. आहारतज्ज्ञ जया गावंडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.