TRENDING:

Stocks आणि Mutual SIP कोणती चांगली? काय आहेत फरक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वाढलेले प्रमाण आणि त्याबद्दलच्या वाढलेल्या जागरूकतेमुळे  गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जाताहेत. यामुळं एसआयपीकडे कित्येक लोकांची पाऊल वळताना दिसत आहेत. असाच म्युचुअल फंडातील एसआयपी सोबतच स्टॉक एसआयपी मध्येही बरेच लोक गुंतवणूक करताना दिसत आहेत. मग हा मुद्दा उभा राहतो की म्युचुअल फंडमधील एसआयपी चांगली की स्टॉक एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या संदर्भात आपण गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत.

Last Updated: November 06, 2025, 16:04 IST
Advertisement

अनेकांच्या मनातील प्रश्न, शर्यतीत धावणाऱ्या बैलांचा खुराक कसा असतो?, अशी असते पूर्ण प्रक्रिया

पुणे

पुणे : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. शर्यतीत धावणाऱ्या बैलाची पोटच्या लेकराप्रमाणे मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. पण अनेकांना प्रश्न पडतो की शर्यतीत धावणाऱ्या या बैलांचा खुराक तरी नेमका कसा असतो. तर याच विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Last Updated: November 06, 2025, 20:15 IST

Silver Benefits : चांदीचे दागिने घालण्याचे आहेत खूपच फायदे, तुम्हीही व्हाल चकित!

मुंबई : धातूंमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते ज्याच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतात त्यावर परिणाम करतात. चांदीचा धातू देखील विजेचा वाहक आहे. चांदीचे मानवी शरीरावर सकारात्मक फायदे (Silver Benefits In Marathi) आहेत. चांदीच्या धातु मध्ये एक चमकदार चमक, एक फॅशनेबल देखावा आहे.

Last Updated: November 06, 2025, 19:52 IST
Advertisement

एसीचा सतत करताय वापर? अतिथंड तापमानामुळे तुमच्या आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम video

कोल्हापूर : सध्याच्या वाढत्या उन्हासोबतच त्यापासून बचाव करण्यासाठी पंखा, कुलरसह एसीचा वापर देखील वाढू लागला आहे. बरेच जण तर दिवसा ऑफिसमध्ये आणि रात्री बेडरूममध्ये सतत एसीच्या वातावरणात राहत असतात. मात्र एसीचा अतिवापर हा आरोग्यावर दुष्परिणाम करणाराच असतो. विविध समस्यांना या एसीच्या अतिवापरामुळे सामोरे जावे लागते असे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिनाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. अनिता परितेकर सांगतात. डॉ. परीतेकर या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील मेडीसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.

Last Updated: November 06, 2025, 19:30 IST

लग्न असो की वाहन खरेदी, मुहूर्तावरच केली जातात अनेक कार्ये, पण शुभ मुहूर्त ठरवतात कसा? Video

पुणे

पुणे : आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं की सर्वात पहिल्यांचा शुभ मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त याचा अर्थ शुभवेळ किंवा चांगली वेळ असा असतो. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ चांगल्या मुहूर्तावर केला तर त्याची फळे भविष्यात चांगली मिळतात, असा लोकमानस असतो. त्यामुळेच मुहूर्त शास्त्राला महत्त्व आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा मुहूर्त शास्त्राशी कधी ना कधी संबंध येतोच. लग्न, मुंज, नामकरण, गृहप्रवेश आदी सोहळ्यांसाठी मुहूर्त पाहूनच वेळ ठरवली जाते. हा शुभ मुहूर्त कसा काढला जातो? आणि त्याचे महत्त्व काय आहे? हे पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: November 06, 2025, 18:57 IST
Advertisement

उष्ण भट्टीसमोर करतात काम, कशी असते विटभट्टी कामगारांची दैनंदिनी? पाहा Video

पुणे : भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा वीट उत्पादक देश आहे. प्राचीन वास्तूंपासून अगदी आजपर्यंत, सर्वात जास्त काळ बांधकामासाठी विटा वापरल्या जात आहेत. वीट उत्पादन काही वर्षांमध्ये अधिक प्रगत झाले आहे. अनेक वर्षे भक्कमपणे उभ्या असलेल्या अनेक जुन्या वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या विटांचा वापर करून बांधल्या गेल्या आहेत. विटभट्टीत वीट कशी बनते आणि या ठिकाणच्या कारागीर यांची दैनंदिनी कशी जाते? या विषयी आपण माहिती जाणून घेणारं आहोत.

Last Updated: November 06, 2025, 18:29 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Stocks आणि Mutual SIP कोणती चांगली? काय आहेत फरक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल