TRENDING:

दवाखान्याचा खर्च वाचवायचा आहे? मग 2026 मध्ये करा 'हा' एकच बदल Video

कोल्हापूर: योगा ही भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. गेल्या काही काळात भारतीय लोक यापासून दूर जात आहेत. पण धकाधकीचं जीवन आणि आरोग्याकडे दुर्लक्ष शरीरासाठी भारी पडू लागलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुळांशी पुन्हा एकदा जोडलं गेलं पाहिजे आणि योगाला जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनवायला हवा. एकंदरीतच योगामुळे आपल्य आयुष्यात नेमका कोणता फरक पडतो? हे कोल्हापुरातील योगा एक्सपर्ट स्नेहा छाब्रिया यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं.

Last Updated: Jan 01, 2026, 13:12 IST
Advertisement

ओल्या तुरीच्या दाण्यांची विदर्भ स्टाईल झुणका, हिवाळ्यात बनवा झणझणीत रेसिपी !

Food

अमरावती: हिवाळ्यामध्ये विदर्भात ओल्या तुरीच्या दाण्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याचा झुणका. विदर्भातील सर्वजण हा पदार्थ अगदी आवडीने बनवतात. हिरवी मिरची वापरून बनवलेला झणझणीत झुणका भाकरी सोबत अतिशय टेस्टी लागतो. काही वेळा हाच झुणका चटणी म्हणून सुद्धा वापरला जातो. हिवाळा सुरू झाला की, विदर्भात नवनवीन पदार्थाची मेजवानी सुरू होते. त्यापैकी एक असलेला आणि कमीतकमी वेळात तयार होणारा विदर्भ स्टाईल ओल्या तुरीच्या दाण्याचा झुणका कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीतील गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.

Last Updated: Jan 01, 2026, 14:07 IST

काळी द्राक्षे खावीत की हिरवी? आरोग्यासाठी कोणती चांगली? खरं कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का Video

छत्रपती संभाजीनगर : आंबट-गोड, रसाळ द्राक्ष लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने खातात. या फळाची चव तर भारी असतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही पाहिलं असेल की, सामान्यपणे मार्केटमध्ये हिरव्या आणि काळ्या रंगाची अशी दोन प्रकारची द्राक्ष मिळतात. अशात अनेकांच्या मनात प्रश्न पडत असेल की, दोन्हीपैकी कोणती द्राक्ष जास्त फायदेशीर असतात? तर या दोन्हीपैकी कुठले द्राक्ष हे फायदेशीर आहेत याबद्दलचं आहार तज्ज्ञ जानवी होगे यांनी माहिती दिली आहे. 

Last Updated: Jan 01, 2026, 13:48 IST
Advertisement

Success Story : २० गुंठे शेती अन् २ लाखांची कमाई! उच्चशिक्षित तरुणाचा पपई शेतीचा यशस्वी प्रयोग ! Video

Success Story

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील अजय पगडे हा उच्चशिक्षित तरुण गेल्या वर्षभरापासून पपई शेती करत आहे. 20 गुंठे क्षेत्रामध्ये 600 पपई झाडांची लागवड या तरुणाने केली आहे. या शेतीसाठी शेणखताचा वापर केला आहे. याबरोबरच पाण्याची व्यवस्था ठिबकद्वारे करण्यात आली आहे. योग्य नियोजन केल्यामुळे पहिल्याच वर्षी अजय पगडे या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: Dec 31, 2025, 19:06 IST

नोकरी सोडली, व्यवसाय सुरू केला; वडापावच्या स्टॉलने केलं मालामाल

नाशिक: स्वप्नं मोठी असतील, तर ती केवळ पगारात पूर्ण होऊ शकत नाहीत, हा विचार उराशी बाळगून नाशिकच्या नेहा गोसावी यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कधीकाळी इतरांच्या हाताखाली काम करणाऱ्या नेहा आज ऋग्वेद मुंबईचा वडापाव या स्वतःच्या ब्रँडद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आज या व्यवसायातून त्या महिन्याला तब्बल 3 लाख रुपयांची कमाई करत असल्याची माहिती त्यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: Dec 31, 2025, 18:44 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/
दवाखान्याचा खर्च वाचवायचा आहे? मग 2026 मध्ये करा 'हा' एकच बदल Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल