
मतदानानंतर ईव्हीएम चक्क ढाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या प्रकारानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी दोन सीलबंद EVM देखील आढळून आल्याने खळबळ उडाली.