
अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना मतदार मतदान करतील का? असा प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी निष्ठावंत उमेदवारांना संधी न मिळाल्याने राज्यभरात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एबी फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांनी कारचा पाठलाग केला, नेत्यांना खडे बोल सुनवले,तर काहींनी कपडे फाडले. अनेकांना त्यांचे अश्रू थांबवता आले नाही. अनेकांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली. म्हणून अनेकांनी अपक्ष उमेदवारीने लढायचा निर्णय घेतला
Last Updated: Jan 02, 2026, 18:33 ISTमहापालिका निवडणुक ऐन रंगात आली आणि त्यातच आता नागपूरात उमेदवारी माघारीवरुन हायहोल्टेज ड्रामा रंगला. भाजपचे किसन गावंडे यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगताच कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात कोंडून ठेवलं
Last Updated: Jan 02, 2026, 20:02 ISTपुण्यात काल रात्री पासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. सरकारच्या चुकीमुळे त्यांच्या परिक्षा हुकत आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक भरतीत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली.
Last Updated: Jan 02, 2026, 19:49 ISTपालिका निवडणुकीत भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी आरोप केले आहेत.त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा मोठा आरोप विरोधकांनी लावला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पण राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Last Updated: Jan 02, 2026, 19:34 ISTसोलापुरात पालिका निवडणुकीमुळे राडा, मतभेद सध्या कायमच चालू आहेत. त्यातच आता एक दुःखद घटना सोलापुरात घडली आहे. अर्ज मागे घेण्यावरुन भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली. तो वाद सोडवण्यासाठी बाळासाहेब सरवदे गेला असता, त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. तो शिवसेना पदाधिकारी होता.
Last Updated: Jan 02, 2026, 18:52 IST