TRENDING:

वरळीत ठाकरेंना सपशेल फेल! मातोश्रीचं आदेश ऐकेना आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात वाद शमेना

Last Updated:

उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप केला तरी बंड थंड करण्यात यश आलेले नाही त्यामुळे बंड  कायम असून निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर न करताना उमेदवारी निश्चित झालेल्यांना एबी फॉर्मचे वाटप केले. तर, दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभेत इच्छुकांच्या नाराजीचा स्फोट झाला. त्यानंतर मातोश्रीवर मोठ्या घडामोडी घडल्या. या वादात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप केला तरी बंड थंड करण्यात यश आलेले नाही त्यामुळे बंड  कायम असून निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेदरम्यान वरळीतील काही प्रभागांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. याची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे यांनी नाराज पदाधिकारी आणि उमेदवारांना मध्यरात्री मातोश्रीवर बोलावून थेट चर्चा केली. उमेदवारी मिळालेल्या तसेच नाराज उमेदवारांसोबत स्वतंत्रपणे संवाद साधत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही, त्यामुळे शिवसेनेला आदित्या ठाकरेंच्या मतदारसंघाच बंड थंड करण्यात अपयश आले आहे.

advertisement

कुठे कुठे झाली बंडखोरी? 

वरळीच्या प्रभाग क्र. 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर कोळी यांची समजूत काढण्यासाठी 'मातोश्री'वर बोलावण्यात आलो होते मात्र त्यांनी अर्ज माघारी घेण्यास नकार दिला असून ते आगामी निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. तसेच ठाकरेंच्या प्रभाग क्रमांत 197 श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे.

advertisement

आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात बंड थंड करण्यात सेना अपयशी

प्रभाग क्रमांक 196 मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. प्रभाग क्र. 196 मधून संगीता जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात बंड थंड करण्यास ठाकरेंची सेना अपयशी ठरला आहे.

advertisement

कुठे कुठे बंडखोरी कायम?

प्रभाग क्र. 202 श्रद्धा जाधव यांच्या प्रभागातील शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. प्रभाग क्र. 203 मधून ठाकरेंच्या सेनेच्या दिव्या बडवे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. या प्रभागात शिवसेनेकडून श्रद्धा पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे . प्रभाग क्र. 106 मधून अपक्ष म्हणून सागर देवरे लढण्यावर ठाम असून प्रभाग क्र. 169 मधून ठाकरेंच्या सेनेच्या प्रविणा मोराजकर यांच्या विरोधात कमलाकर नाईक यांनी बंड कायम ठेवले आहे.

advertisement

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात अंतर्गत बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्ष नेतृत्वाने वेळीच हस्तक्षेप केला. मात्र

ही नाराजी शमवण्यात ठाकरेंना यश आले नाही.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात तेजी, कपाशी, तूर आणि सोयाबीनला किती मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

निवडणुकीआधी महायुतीची हाफ सेंच्युरी; कुठे, कुणाचे किती बिनविरोध नगरसेवक? वाचा राज्याची संपूर्ण यादी

मराठी बातम्या/मुंबई/
वरळीत ठाकरेंना सपशेल फेल! मातोश्रीचं आदेश ऐकेना आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात वाद शमेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल