
राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्यापासून सुरु होणार आहे. त्यात आता हे अधिवेशन विरोधकांशिवाय होणार आहे. त्यावरुन विरोधकांनी यावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "राज्याला दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही.याची महाराष्ट्र सरकारलाच नाही तर देशाच्या सरकारलाही लाज वाटायला हवी."