मुंबईतील गोरेगावच्या आलीशान अनमोल टॉवरच्या लिफ्टमध्ये ही धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाला. हे फुगे वाढदिवसानिमित्त मागवले होते.ही फुग्यांची पिशवी घेऊन डिलीवरी बॉय लिफ्टमध्ये शिरला असता हा स्फोट झाला.