TRENDING:

मुंबईतील चर्चित लालबाग ‘मिर्ची गल्ली’वर पालिकेचा हातोडा, २ दिवसांत रस्ते मोकळे!

Last Updated:
मुंबईतील चर्चेत असलेल्या लालबाग ‘मिर्ची गल्ली’तील अतिक्रमांवर पालिकेचा हातोडा पडला. मसाल्यांच्या दुकानांच्या आसपास असलेले १०-१५ फूटपर्यंत अतिक्रमण हटवले गेले आहे.
advertisement
1/5
मुंबईतील चर्चित लालबाग ‘मिर्ची गल्ली’वर पालिकेचा हातोडा, २ दिवसांत रस्ते मोकळे!
लालबागमधील ‘मिर्ची गल्ली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पालिकेने अतिक्रमणांवर कारवाई करत पादचारी मार्ग मोकळा केला.
advertisement
2/5
मिर्ची गल्लीतील बहुतांश दुकानांनी अनेक वर्षांपासून आपल्या दुकानांच्या पुढे जवळपास १०-१५ फूट जागा सार्वजनिक चालण्याच्या जागेत घुसवून, पादचाऱ्यांची चालण्याची जागा अक्षरशः गिळंकृत केली होती.
advertisement
3/5
मसाल्यांच्या दुकानांसमोर लाल मिरचीचे ढिग लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते.
advertisement
4/5
दोन दिवस चाललेल्या मोहिमेत वाढीव शेड्स, स्टॉल्स आणि बाहेर ठेवलेला माल जप्त करण्यात आला.
advertisement
5/5
पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उपलब्ध झाली असून वाहतूक कोंडीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबईतील चर्चित लालबाग ‘मिर्ची गल्ली’वर पालिकेचा हातोडा, २ दिवसांत रस्ते मोकळे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल