TRENDING:

काजू खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, मधुमेह आणि हृदयविकारही राहतील दूर, Video

मुंबई: उत्तम आरोग्यासाठी आहारात ड्रायफ्रूट असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. काजू हे सुद्धा असेच एक हेल्दी ड्रायफ्रूट आहे. त्याचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्या पदार्थाची चव जणू दुपटीने वाढते. पण काजूमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Nov 07, 2025, 17:01 IST
Advertisement

साईबाबांची शिर्डी भक्तांनी गजबजली, देशविदेशातील भक्त साईचरणी,VIDEO

अहिल्यानगरमध्ये शिर्डी साईमंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवे वर्ष सुरु होणार आहे. तसेच पर्यटन सुरु झाले आहे. त्यामुळे या मंदिरात खूपच भक्तांची गर्दी झाली.चक्क देशविदेशातून भक्त साईचरणी लीन झाले आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरला साईमंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.

Last Updated: Dec 28, 2025, 17:45 IST

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 मजुरांचा मृत्यू,VIDEO

चंद्रपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रपूरमध्ये सध्या बांबू कापायचे काम सुरु आहे. त्यासाठी तेथे बालाघाटातून मजूर आले आहेत. त्यातील काही मजूर ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील महादवाडीच्या जंगलात काम करत होते. तेव्हा वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन मजूरांचा मृत्यु झाला आहे. प्रेम सिंग हुदे आणि बुधासिंग मढावी अशा मृत व्यक्तींची नावे आहेत.

Last Updated: Dec 28, 2025, 17:32 IST
Advertisement

बिबट्या चक्क नारळाच्या झाडावर, सांगलीतला VIDEO

बिबट्याची दहशत राज्यभर सुरु आहे. त्यातच आता सांगली, येडे निपाणी तालुक्यात वाळवा येथे नारळाच्या झाडावर बिबट्या चढलेला दिसून आला. उत्तम पाटील यांच्या शेतात बिबट्या नारळाच्या झाडावरुन खाली उतरताना काही नागरिकांना दिसला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.गेल्या महिन्याभरात अनेकवेळा बिबट्याचा परिसरात वावर दिसून आला आहे.

Last Updated: Dec 28, 2025, 17:17 IST

मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई, मुंबईत जागांवरुन रस्सीखेच नाही... संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं, VIDEO

राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, आता मुंबई महानगर पालिकेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचाच लक्ष आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युतीही पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांच्या जागावाटपाचा तेढ नेमका काय आहे? यावर मोठी चर्चा होत आहे. तेव्हाच शिवसेना उबाठाचे खासदार ,संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की,"जागांवरुन कोणतीही रस्सीखेच नाही. मुंबई पालिका निवडणुक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची,अस्मितेची लढाई आहे."

Last Updated: Dec 28, 2025, 16:27 IST
Advertisement

शिवसेना संपली की भाजपवाले मुंबई गिळायला मोकळे, उद्धव ठाकरेंचा घणाघात, VIDEO

मुंबईत शिवसेना भवनात उबाठाची बैठक झाली. तेव्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना विभाग प्रमुख,शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन केले आहे. तेव्हा ते म्हणाले,"भाजपने युतीच नाही तोडली तर,ते आता शिवसेना खतम करायला निघालेत. मुंबईत एकदा काय शिवसेना खतम झाली की ते मुंबई गीळायला मोकळे झाले.

Last Updated: Dec 28, 2025, 15:50 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
काजू खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, मधुमेह आणि हृदयविकारही राहतील दूर, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल