TRENDING:

शिंदेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! VIDEO

महानगर पालिकेचं बिगुल वाजलं असून, आता प्रत्येक पक्षांची निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहिर झाली आहे. सोबतच राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांनी विरोधी पक्षावर प्रहार करत आपलं मत मांडलं आहे.

Last Updated: Dec 25, 2025, 20:45 IST
Advertisement

ठाकरे बंधूंच्या युतीत काल नाचले अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले, VIDEO

भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी मेगा भरती पाहायला मिळत आहे. त्यातच नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक दिनकर पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे समजते. ते मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते. पण आता हा मनसेला मोठा धक्का भाजपने दिलेला आहे. दीनकर पाटील यांनी मनसेला राजीनामा पाठवल्याचे सांगितले आहे.

Last Updated: Dec 25, 2025, 21:59 IST

कोल्हापूरात लक्ष्मीपुरीत भीषण आग,VIDEO

कोल्हापूरातील ही धक्कादायक बातमी आहे. कोल्हापूरातील लक्ष्मीपुरीताल भूपाल टॉवर बेसमेंटला आग लागली आहे. यात किती जीवितहानी झाली ती अद्याप समजली नाही.ही आग का लागली त्याचे कारणही समजलं नाही. अग्निशमन दलाने वेळेत येऊन ही आग नियंत्रणात आणली.

Last Updated: Dec 25, 2025, 21:32 IST
Advertisement

"हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण" संजय राऊतांचा विरोधक्कांवर हल्लाबोल,VIDEO

शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर टीका करत म्हणाले, "भाजप जगातला मोठा पक्ष आहे असा ते दावा करतात. त्यांच्याकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि दहा हजार कोटीचा निधी आहे. तरीही त्यांना इतर पक्षांचे खासदार,आमदार,नगरसेवक फोडावे लागतात.हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण आहे."

Last Updated: Dec 25, 2025, 21:15 IST

'तारा' वाघीणीचा मुक्त संचार, पण नागरिक भयभीत..! video

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली अभायरण्यात निसर्गमुक्त करण्यात आलेली पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील मांइंगडेवाडी गावात 'तारा' वाघीण संचार करताना दिसली. ती रस्त्यावर एसटीच्या समोर आली. त्यामुळे वाहनं थांबवण्यात आली. ही वाघीण रस्ता ओलांडून जंगलात गेली. पण सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पण हा मुक्त संचार पर्यावरणवादींसाठी दिलासादायक आहे.

Last Updated: Dec 25, 2025, 20:29 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
शिंदेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल