गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री कोणाच्या तरी प्रेमात असल्याची चर्चा होती, पण तो नशीबवान तरुण नक्की कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र, खुद्द गायत्रीने यावरून आता अधिकृतपणे पडदा उचलला आहे.
समुद्रकिनारा, रोमँटिक गाणं अन् गायत्रीचा 'सांता'!
२५ डिसेंबर, ख्रिसमसच्या दिवशी गायत्रीने सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक व्हिडिओ शेअर केला. प्री-वेडिंग शूटसारख्या वाटणाऱ्या या व्हिडिओमध्ये गायत्री एका देखण्या तरुणासोबत समुद्रकिनारी आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे.
advertisement
हा व्हिडिओ शेअर करताना तिने दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिने लिहिलंय, "भेटा अशा व्यक्तीला, जो आयुष्यभरासाठी माझा 'सांता' असणार आहे!" यासोबतच तिने #engaged आणि #love असे हॅशटॅग वापरून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
कोण आहे गायत्री दातारचा होणारा नवरा?
गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे श्रीकांत चावरे. आता हा श्रीकांत नक्की काय करतो? हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्याचं उत्तर मिळालं आहे. श्रीकांतचं इन्स्टाग्राम प्रोफाईल प्रायव्हेट असलं, तरी मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत हा कमालीचा हुशारही आहे. श्रीकांतने देशातील नामांकित संस्था असलेल्या IIT मुंबईमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
तांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी असली, तरी श्रीकांतला कलेची प्रचंड आवड आहे. तो एक उत्तम फोटोग्राफर असल्याचं समजतंय. श्रीकांत हा अस्सल मुंबईकर असून त्याचं आणि गायत्रीचं ट्युनिंग व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय.
सोशल मीडियावर प्रेमाची कबुली
गायत्रीच्या या पोस्टवर श्रीकांतने केलेली कमेंट सध्या व्हायरल होत आहे. त्याने लिहिलंय, "तू मला मिळालेलं आजवरचं सर्वात उत्तम गिफ्ट आहेस." या एका वाक्यात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांनीही या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. "दोघंही सोबत खूप छान दिसतायत," "आयआयटीयन आणि अभिनेत्री... परफेक्ट कॉम्बिनेशन!" अशा कमेंट्सने तिचं कमेंट सेक्शन भरून गेलं आहे.
