TRENDING:

आधी पंजाने मारलं मग लोळवलं, वाघिणींच्या झुंजीचा थरार, पाहा VIDEO

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी वाघिणींच्या झुंजीचा थरार अनुभवला. रामटेक तालुक्यांतर्गतच्या खुरसापार व्याघ्र प्रकल्पातील फेमस चायपत्ती क्षेत्रात बी-२ व बिंदू या दोन वाघिणींमध्ये झुंज झाली. हद्दीच्या वादातून या दोन्ही वाघिणी भिडल्या. पर्यटकांसमोरच या वाघिणींची झुंज झाली.

Last Updated: October 16, 2024, 07:55 IST
Advertisement

Health Tips : मिठाचा शरीरावर कसा परिणाम होतो? कमी खाणे चांगले की वाईट? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कधी असा विचार केला आहे का, जर तुम्ही आहारामधून मीठ कमी केलं तर त्याचा तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतो? कारण की लोक असे म्हणतात जर आपण आहारामधून मीठ कमी केलं तर त्यामुळे आपला उच्च रक्तदाब हा नियंत्रणात राहतो. काहीजण म्हणतात जर मीठ कमी केलं तर त्यामुळे वाईट परिणाम देखील होतात. पण जर आपण आहारामध्ये मीठ कमी केल्याने त्याचे काय परिणाम होतात म्हणजे चांगले की वाईट हेच? आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलेलं आहे.

Last Updated: November 01, 2025, 20:09 IST

Health Tips : हिवाळ्यात तळपायाला भेगा पडतात? हा सोपा उपाय करून बघा, तळपाय राहील मुलायम

अमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडत असल्याने अनेक त्रास होतात. त्यातीलच एक म्हणजे तळपायाला भेगा पडणे किंवा तळपाय बेकार होणे. तळपायाला भेगा पडल्या की, चालायला त्रास होतो. अशावेळी मग अनेक महागडे प्रॉडक्ट आणून त्यावर उपाय केले जातात. काहीवेळा घरगुती त्रासदायक उपाय देखील केले जातात. पण, अगदी घरगुती सोपा उपाय करून तळपाय मुलायम आणि निरोगी राहू शकतात. याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.

Last Updated: November 01, 2025, 19:43 IST
Advertisement

मुंबईतील आगळावेगळा कॅफे, पदार्थांसोबत घ्या पुस्तकं वाचण्याचा आनंद, हे आहे लोकेशन

मुंबई : आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोकांना असा कोपरा हवा असतो जिथे ते आरोग्यदायी, चविष्ट अन्नाचा आस्वाद घेताना थोडा शांत वेळ घालवू शकतील. विलेपार्ले (पूर्व) येथील राममंदिर रोडवरील विधर्भ वडापावच्या शेजारी नुकताच सुरू झालेला सुवर्णा एलिक्सर टेल्स हा अनोखा कॅफे अशा लोकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

Last Updated: November 01, 2025, 19:19 IST

चविष्ट अन् पौष्टिक, हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO

मुंबई : हिवाळ्यात पौष्टिक आणि जीवनसत्त्व संपूर्ण आहार सेवन करण्याचा आपल्या सर्वांनाच डॉक्टर सल्ला देत असतात. अशातच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्य हे पर्याय हे शरीरासाठी फार आरोग्यदायी असतात. ज्वारी, बाजरी, नाचणी या सारखे कडधान्य सहज उपलब्ध होत असतात आणि ते शरीरासाठी फार उपाय कारक ठरतात. हिवाळ्यात नाचणीच्या पीठाचे सूप कसे करायचे? याबद्दलचं आपल्याला मुंबईतील गृहिणी रफीका सोलकर यांनी माहिती सांगितली आहे.

Last Updated: November 01, 2025, 18:53 IST
Advertisement

हिवाळ्यात केसांत कोंडा वाढतोय, खाजही सुटते? डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय

अमरावती: हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे केसातील कोंडा. केसातील कोंडा वाढला की डोक्याला खाज सुटणे, कपाळावर पुरळ येणे, चेहऱ्याला खाज येणे, अशा समस्या वाढतात. त्यातच खाजवताना हाताला कोंड्याचे बारीक कण लागतात आणि इन्फेक्शन होते. त्यामुळे केसातील कोंडा कमी करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात केसातील कोंडा टाळण्यासाठी काय उपाय करावेत? याबाबत अमरावती येथील त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.

Last Updated: November 01, 2025, 18:11 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
आधी पंजाने मारलं मग लोळवलं, वाघिणींच्या झुंजीचा थरार, पाहा VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल