TRENDING:

मोठी बातमी : निवडणूक कामकाजात गैरहजर राहणाऱ्या 17 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Last Updated:
छत्रपती संभाजीनगरात 17 कर्मचारी-अधिकारी वारंवार आदेश देऊनही आणि मोबाईलद्वारे संपर्क करूनही कामावर रुजू झाले नाहीत.
advertisement
1/5
मोठी बातमी : निवडणूक कामकाजात गैरहजर राहणाऱ्या 17 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकीसाठी नियुक्ती केल्यानंतर कामावर हजर न झालेल्या 17 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 च्या अनुषंगाने स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये एकूण 132 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
advertisement
3/5
यापैकी 17 कर्मचारी-अधिकारी वारंवार आदेश देऊनही आणि मोबाईलद्वारे संपर्क करूनही कामावर रुजू झाले नाहीत.
advertisement
4/5
त्यांनी वैद्यकीय रजा किंवा इतर कामांची कारणे सांगून निवडणूक कर्तव्यावर हजर राहण्याचे टाळले, ज्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
5/5
दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक करणा-या व निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविणा-या कनिष्ठ लेखापरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. दीपक जोहरे असे निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ लेखापरीक्षकाचे नाव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मोठी बातमी : निवडणूक कामकाजात गैरहजर राहणाऱ्या 17 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल