
नागपुरातील नरसाळा भागात मनाला चटका लावणारी एक घटना घडली आहे. स्मशानघाटाजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरात मुलगी दिसून न आल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी मृत अवस्थेत ही चिमुकली दिसली. पण हा नेमका प्राणी कोणता होता याचा शोध अजूनही लागलेला नाही. अनुष्का रवी मेळा असं या चिमुकलीचं नाव आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 15:23 ISTअमरावती : हिवाळ्यामध्ये पौष्टीक पदार्थ सेवन करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतात. सद्यस्थितीमध्ये आहारातून ज्वारी, बाजरी आणि त्यासारखेच काही पदार्थ बाद झाले आहेत. पण, ते पौष्टीक असल्याने आहारात घेणे आवश्यक आहे. बाजरी हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे बाजरीची चटपटीत खिचडी तुम्ही आहारात घेऊ शकता. ती कशी बनवायची याबद्दलच अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 16:59 ISTराज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच वेगवेगळ्या पक्षांची युती पाहायला मिळाली. त्यांच्या जागावाटपावर मोठ्या चर्चा चालू आहेत. त्यातच आता सोलापूरमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी,शहर प्रमुख महेश धाराशीवकर,मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्यात हॉटेल सीटीपार्क येथे बैठक सुरु असताना हा वाद उफाळला. उमेदवारीवरुन चर्चा चालू असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोन्ही गट करत होते. सोलापूर मनपाच्या प्रभाग क्रमांक 8 साठी शांत चालत असलेली बैठक पुढे हमरीतुमरीवर पोहोचली.
Last Updated: Dec 27, 2025, 16:47 ISTठाणे: दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. या काळात आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. अनेकजण या काळात विविध प्रकारचे सूप पिण्याला प्राधान्य देतात. यात टोमॅटो सूपला विशेष पसंती असते. हिवाळ्यातील थंड वातावरणात टोमॅटो सूप आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपणही आपल्यात अगदी 10 मिनिंटात आरोग्यदायी टोमॅटो सूप बनवू शकता. याचीच रेसिपी ठाण्यातील गृहिणी छाया शिंदे यांनी सांगितली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 16:28 ISTबारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका हॉटेल चालकाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. हॉटेल चालकाने त्या इसमाला हप्ता न दिल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. जर हॉटेल चालवायचं असेल तर हफ्ता द्यावा लागेल अशी धमकी या इसमाने हॉटेल चालकाला दिली. संबंधीत व्यक्तीची शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
Last Updated: Dec 27, 2025, 16:22 ISTराज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यातचं आता छ.सभाजीनगमध्ये MIM च्या उमेदवारीवरुन दोन गटात तुफान राडा झाला आहे. प्रभाग क्र.12 मध्ये माजी नगरसेवक हाजी इसाक यांना उमेदवारी डावलून मोहम्मद असराक यांना MIM कडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हा त्यांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान हाजी इसाक समर्थकांनी मोहम्मद असराक यांच्यावर हल्ला केला.
Last Updated: Dec 27, 2025, 16:05 IST