
सटाणा शहरामध्ये नाशिक नाका परिसरात एक भीषण अपघात झाला. रात्रीच्या वेळी एक खडीने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येऊन एका मार्बलच्या दुकानाला धडकला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Last Updated: Dec 27, 2025, 20:56 ISTनांदेडच्या मुडखेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.मुलांनी आई-वडिलांची हत्या करुन आत्महत्या करुन घेतली आहे. शवविच्छेदनानंतर हे सर्व उघडकीस आले.या एकाच कुटुंबातील मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले
Last Updated: Dec 27, 2025, 22:05 ISTपुण्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता विकोपाला गेला आहे. शिंदे शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात जागावाटपावरुन वाद झाले आहेत.त्यामुळे भानगिरे आता उपमुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.
Last Updated: Dec 27, 2025, 21:47 ISTनवी मुंबई विमानतळामधून प्रवासी वाहतूक सुरु झाली. पहिल्याच दिवशी 4,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे. आता मुंबईतील प्रवाशांना अटल सेतूमुळे नवी मुंबई विमानतळ प्रवास जलद होत आहे. नवी मुंबई विमानतळ ते सांताक्रुझ विमानतळ हे अवघं 18 किमी आहे. या विमानतळामुळे वेळ आणि अंतर यांची बचत होणार आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 21:12 ISTशिवसेना(उबाठा) चे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, "आम्ही याक्षणी 115 जागा जिंकत आहोत.मुंबईत ठाकरे बंधू शतक पार करणार.भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे."
Last Updated: Dec 27, 2025, 20:38 IST