नाशिक - महाराष्ट्राला खूप मोठी खाद्यसंस्कृती लाभली आहे. येथील प्रत्येक विभागातील विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. आज आपण नाशिकमधील अशाच प्रसिद्ध जिलेबीबद्दल जाणून घेणार आहोत. जिलेबी म्हटल्यावर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. नाशिकमध्ये तब्बल 66-67 वर्षांपासून बुधा हलवाई यांची जिलेबी प्रसिद्ध झाली आहे. जिलेबी म्हटल्यावर नाशिकमध्ये सर्वात आधी बुधा हलवाई यांच्या जिलेबीला पसंती दिली जाते.