TRENDING:

Special Report काँग्रेसकडून जिंकले भाजपकडे गेले, काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपमध्ये दाखल

Politics

अंबरनाथ नगर पालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी युती केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरील नाराजी व्यक्त केली गेली. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक थेटपणे भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसला जबर झटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने पक्ष कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. राज्य आणि देशपातळीवर विचारधारेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या काँग्रेस-भाजपची युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दोन्ही पक्षांवर टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पावले उचलून नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले.

Last Updated: Jan 08, 2026, 21:47 IST
Advertisement

शेवग्याच्या शेंगाच नाही तर पानंही आहेत अमृत! ५ मिनिटांत बनवा ही 'मल्टिव्हिटॅमिन' चटणी; पाहा रेसिपी

अमरावती : शेवगा हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. दररोजच्या जेवणात शेवगा घेतल्यास अनेक आजारांना आळा घालता येतो. पण, दररोज आहारात शेवगा घ्यायचा कसा? तर शेवग्याच्या पानांची चटणी बनवून तुम्ही आहारात घेऊ शकता. अगदी कमीत कमी साहित्यात टेस्टी अशी चटणी तयार होते. शेवग्याच्या पानांची चटणी कशी बनवायची? ती रेसिपी जाणून घेऊ.

Last Updated: Jan 09, 2026, 17:01 IST

'... याचा धोका सर्वाधिक', राज ठाकरे असं का म्हणाले ?, VIDEO

Politics

महामुलाखतीतून राज ठाकरेंनी सरकारला सवाल केला आहे. तेव्हा ते म्हणाले, "इच्छा चांगली आहे. पण वरुन जे सांगतिल तेच त्यांना ऐकावं लागणार.वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. चंद्र सुर्याचे दाखले कितीही दिले तरी वरच्या दोघांच्या मनात काय आहे ते कळणं गरजेचं आहे. 50-60 वर्षात जे घडलं नाही ते आज घडतंय याचा धोका सर्वाधिक"

Last Updated: Jan 09, 2026, 16:47 IST
Advertisement

"मलिक नको म्हणणारे आता त्यांनाच मांडीवर घेवून बसलेत " राऊतांची एकनाथ शिंदेवर बोचरी टीका, VIDEO

Politics

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. ते देशद्रोही आहेत, दहशतवादी आहेत असं म्हणणारे आता एमआयएम आणि काँग्रेसला मांडीवर घेवून बसतात. याच्यावर उत्तर द्या."

Last Updated: Jan 09, 2026, 16:32 IST

घरात फक्त मुरमुरे आहेत? मग पाहा ही नवीन रेसिपी; कमी तेलात तयार होतो चविष्ट 'मुरमुरे पराठा' Video

अमरावती : सकाळ झाल्यानंतर प्रत्येक आईला पहिली घाई असते ती म्हणजे मुलांच्या टिफीनची. कारण मुलांना पौष्टीक सोबतच टेस्टी नाश्ता सुद्धा हवा असतो. अनेक वेळा पौष्टीक नाश्ता टेस्टी नसतो आणि टेस्टी नाश्ता पौष्टीक नसतो. तर या दोन्हींचा मेळ साधता येईल असा पदार्थ नेमका कोणता बनवयचा? हा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो. तर त्यासाठी एक ऑप्शन म्हणजे मुरमुरे आणि इतर काही साहित्य वापरून बनवलेला पराठा. मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट मुरमुरे पराठा कसा बनवायचा? त्याची रेसिपी अमरावतीमधील कोयल निंभोरकर यांनी सांगितली आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 16:20 IST
Advertisement

'पुढील 20 वर्षं घरपट्टी, पाणीपट्टीत वाढ होणार नाही' गणेश नाईकांचं नवी मुंबईकरांना आश्वासन, VIDEO

Politics

भाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं, "घरपट्टी पाणी पट्टी वाढणार नाही आणि आता बोलतो पुढील 20 वर्षं घरपट्टी, पाणीपट्टीत वाढू देणार नाही. नवी मुंबई शहर हे परमेश्वराने आशीर्वाद दिलेलं शहर आहे."

Last Updated: Jan 09, 2026, 15:57 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Special Report काँग्रेसकडून जिंकले भाजपकडे गेले, काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपमध्ये दाखल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल