
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिले भाषण करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित दादांची आठवण काढली. दादांचे नाव घेताच सुनेत्रा ताईंचा कंठ दाटून आला, आवाज कातर झाला. दादांच्या जाण्याच्या दु:खातून आपण अद्याप सावरलो नसल्याचे त्या म्हणाल्या.